GDPL अपडेट : पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यात गडचिरोली हरीकेन्सची कुरखेडा लायन्सवर मात

64

The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग -२०२५ स्पर्धा रोमांचक चरणात असून पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यात गडचिरोली हरीकेन्स संघाने कुरखेडा लायन्स संघाला मात देत तब्बल १०८ धावांनी विजय मिळवला आहे.
गुरुवार २० फेब्रुवारी रोजी पार पडलेला गडचिरोली हरिकेन्स विरुद्ध कुरखेडा लायन्स सामना बघायला क्रिकेट रसिकांची प्रचंड गर्दी झाली होती. २० षटकांच्या या सामान्यात गडचिरोली हरीकेन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाने जोरदार फटकेबाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून १४३ धावांचा डोंगर उभारला. मनीष खटी ४७ चेंडूंत ६१ धावा, विजय कोडपे २९ चेंडूंत ३२ धावा, सौरव देवडे १० चेंडूंत १८ धावा यांनी संघाला हा धावांचा डोंगर उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कुरखेडा लायन्सच्या शाहस्वत कडाओ याने ४ षटकांत २२ धावा देत २ विकेट मिळवल्या. पण या संघाची गोलंदाजी गडचिरोली हरीकेन्सला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखू शकली नाही. या धावसंख्येचा पाठलाग करताना कुरखेडा लायन्सची चांगलीच दमछाक झाली. कुरखेडा लायन्स संघाने १०.५ षटकांत आपले संपूर्ण १० गडी गमावून केवळ ३९ धावाच जमवल्या. त्यामुळे गडचिरोली हरीकेन्सने हा सामना १०८ धावांनी जिंकत कुरखेडा लायन्सचा दणदणीत पराभव केला. गडचिरोली हरीकेन्सकडून गोलंदाजी करताना राजू कुंब्रे ३ षटकांत ३ धावा २ विकेट, आदित्य तितिरमारे ४ षटकांत २२ धावांत ३ विकेट, तर
विजय कोडपे याने २.५ षटकांत ४ धावा देत ४ विकेट घेतल्या. या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा विजय कोडापे याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याने २९ चेंडूंत ३२ धावा कुटल्याच दडपण शिवाय केवळ ४ धावा देत कुरखेडा लायन्सचे ४ गडी बाद केले. पहिल्या क्वार्टर फायनलमधील पराभूत संघ कुरखेडा लायन्सला ११ हजार १११ चा धनादेश देण्यात आला. या पहिल्या सामन्यातील नाणेफेक जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here