कोरेगाव – रांगी मार्गावर झालेल्या अपघातात युवक जखमी

475

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ११ : आरमोरी तालुक्यातील कोरेगाव मार्गावरून रांगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोरेगाव गावाच्या समोरच्या नागमोडी मार्गावर दुचाकी स्लिप होवुन झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
आरमोरी कडून येणारी दुचाकी MH 33 V 3201 कोरेगाव च्या गावाबाहेरील कॉर्नरवर असताना समोरून येणारे ट्रक न दिसल्याने मनात भीती निर्माण होवून अचानक दुचाकी ला ब्रेक मारल्याने दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात रांगी येथील युवक रामलाल मुराजी उसेंडी (वय अंदाजे ४५) हे जखमी झाले आहेत.
आरमोरी ते धानोरा रस्त्याचे नव्याने रुंदीकरण, खडगीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र विहिरगाव पासून रांगी गावापर्यंत रुंदीकरण न केल्याने मोठे दोन वाहन एकावेळी काढायला अडचण होते. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले. परंतु संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येते. दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. तसेच या मार्गावर सध्या रेतीच्या हाँयवा ट्रक ची मोठी रेलचेल असते. इतर वाहने सुद्धा ये जा करित असतात त्यामुळे विहिरगाव ते रांगी ऐवढे अंतराचे रुंदीकरण आवश्यक आहे. तरी संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन रुंदीकरणाचे काम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here