आरोपींना वनकोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : शेतालगत फासे लावून चितळाची शिकार करून मासाची मासाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर तिघांना बोलावून वाटणी मासाची वाटणी करीत शिजवून खाल्ल्याची माहिती वनविभागाला मिळताच चौघांनाही ताब्यात घेतल्याची कारवाई वनविभाागाने रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथे केली. याप्रकरणी शंकर रामा आत्राम, किशोर मल्लेश सडमेक, मुकेश कलमशाही मडावी, मल्लेश येररा सडमेक सर्व रा. वियजपूर ता. मुलचेरा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील सर्व आरोपींनी बोटलाचेरू गावालगत असलेल्या शेतात चितळाला फाशामध्ये फसवून शिकार केली. त्यानंतर चौघांनीही ते शिजवून खाल्ले मात्र यातील एकाने शिकारीचे बिंग फोडल्याने शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करीत शिजविलेले मास वनविभागाने जप्त करीत चौघांनाही ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणात आणखी किती लोक समाविष्ट आहेत याची सखोल चौकशी सुरू असून ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांनाही न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची वन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
