– डोक्याला गंभीर जखम
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १७ : तालुका मुख्यालयापसून जवळच असलेला कसारी फाटा नजीक भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १७ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास मधुकर नाकाडे (वय अंदाजे ४५) रा. बोर्धाब- कोरेगाव ता. देसाईगंज असे अपघातात ठार झालेल्या दुसचाकीस्वाराचे नाव आहे. कसारी फाटा नजीक रस्त्याच्या कडेला दुचाकी आणि कैलास हे पडलेले काही नागरिकांना दिसले. दरम्यान पाहणी केली असता अपघात झाले निदर्शनास येताच पोलीसांना याबाबत कळविले. कैलास यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असे कळते. परंतु नेमका अपघात झाला कसा हे कोणालाच कळले नाही. अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
जिल्ह्यात सुसाट वाहनांनी अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तसेच काही अवैध व्यवसाय करणारे सुद्धा स्वतःचा बचाव करण्यासाठी सुसाट वाहने चालवत असतात त्यामुळे सुद्धा काही अपघात होत असतात असे सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #accident #roadaccident #kasarifata )














