– उमेदवारांनी माहिती अद्यावत करण्याच्या सूचना
The गडविश्व
गडचिरोली दि. १३ : जिल्हा परिषद अंतर्गत मार्च-२०१९ व ऑगस्ट-२०२१ मधील गट-क व आरोग्य विभागाच्या पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये रद्द करण्यात आली आहे. या पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी ५ सप्टेंबर २०२३ पासुन सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरावी. त्या अनुषंगाने परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी यापुर्वी माहिती भरलेली आहे. अशा उमेदवारांनी स्वत:चे बँक खाते क्रमांक नमुद करुन माहिती अद्यावत करावी.
उमेदवारांनी चुकीची माहिती भरल्यामुळे परिक्षा शुल्क त्यांचे बँक खात्यावर परत न झाल्यास जिल्हा परिषद, जबाबदार राहणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांकडुन प्राप्त कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषद पदभरती निवड समितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार यांनी कळविले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #zpgadchiroli )
