छाया-अग्निशमन दलाने आगीवर मिळविले नियंत्रण
The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या वसा येथील पेट्रोल पंपावर तार भरलेला ट्रक बाजुला उभा करुन ठेवलेला असताना आज रविवार १२ मे रोजी २.३० ते ३.०० वाजताच्या दरम्यान अचानक ट्रकने पेट घेतला. यावेळी एकचं तारांबळ उडाली होती.
दरम्यान यावेळी आग लागताच पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रूद्र रूप धारण केल्याने वेळीच गडचिरोली नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #wasapeteolpump #porlapeteolpump #theburningtruckgadchiroli)
