‘या’ तारखेपर्यंत पाठवा प्रकल्प लॉगीनवर शिष्यवृत्ती / फ्रिशिप चे अर्ज

484

– अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती बाबत आवाहन
The गडविश्व
गडचिरोली,दि. ०६ : शैक्षणिक सत्र २०२३-२४ करीता mahadbt.maharashtra.gov.in हे शिष्यवृत्ती //फ्रिशिप फॉर्म भरणेस्तव पोर्टल सुरु झालेले आहे. महाविद्यालयातील मॅट्रीकोत्तर प्रवेशित असलेल्या सर्व अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याचे भारत सरकार शिष्यवृत्ती /फ्रिशिप अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करुन तात्काळ भरुन घेण्यात यावे व त्यासंबंधी सुचना महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांना देण्यात यावे. तसेच सुचना सुचना फलकावर सुचना लावण्यात यावी. महाविद्यालयातील शिष्यवृत्ती हातळणाऱ्या लिपिकाने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शिष्यवृत्ती /फ्रिशिप अर्जाची व आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची ऑनलाईन तपासणी करण्यात यावी. शिष्यवृत्ती / फ्रिशिप करीता पात्र असलेले सर्व अर्ज पुढील कार्यवाही करीता प्रकल्प लॉगीनवर शिष्यवृत्ती / फ्रिशिप चे अर्ज २५ मार्च २०२४ चे आत पाठविण्यात यावे.
शिष्यवृत्तीचे परीपुर्ण प्रस्ताव मुदतीत सादर झाले नाहीत व पोर्टल बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासुन वंचित राहावे लागले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील याला हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी. महाविद्यालयाने ऑनलाईन परीपुर्ण असलेले अर्ज या कार्यालयाला मंजुरी करीता ऑनलाईन सादर करणे तसेच विद्याथ्यानी शिष्यवृत्ती / फ्रिशिप अर्ज भरणे करीता राहुल कुमार मीना, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी सर्व महाविद्यालयाला व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here