कुरखेडा- देसाईगंज मार्गावर वाहन चालक संघटनेचा दिड तास चक्काजाम

795

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा ( चेतन गहाने) दि. ०२ : जाचक हिट अँड रन कायदा रद्द करण्याचा मागणी करीता आंदोलनाच्या दूसऱ्या दिवशी शिवसेना (उबाठा) प्रणीत वाहन चालक संघटना व जय संघर्ष वाहन चालक संघटनेचा वतीने आज मंगळवार रोजी कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील बायपास जवळ दिड तास चक्काजाम आंदोलन करीत काळा कायदा रद्द करण्याकरीता जोरदार नारेबाजी करण्यात आली.
हिट अँड रन कायद्यात अपघाताला जबाबदार वाहन चालकांचा विरोधात १० वर्षाचा कारावास व ७ लाखाच्या दंडाची तरतूद आहे. जेमतेम मिळकतीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब वाहन चालकांचे कुटूंबच या कायद्याने उध्वस्त होण्याचा धोका असल्याने राष्ट्रव्यापी या कायद्याचा तिव्र विरोध होत आहे. तालूक्यातील वाहन चालक संघटना सुद्धा १ जानेवारी पासून आपले सर्व खाजगी प्रवासी मालवाहक वाहने बंद ठेवत आंदोलनात सहभागी झाले आहेत. काल सोमवार रोजी तहसीलदार मार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले होते तर आज येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलन स्थळी पोहचत ठाणेदार संदीप पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करीत त्यांच्या भावना शासनाकडे पोहचविण्याचे आश्वासन देत समजूत काढली व रस्ता मोकळा केला.

 

आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमूख सुरेंन्द्रसिंह चंदेल, तालूका प्रमुख आशिष काळे, जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष भारत गावळ, सचिव जावेद शेख, उपाध्यक्ष शाम थोटे, सचीन पंडित, कैलाश उईके, आशिष हिळको, अनिल ठाकरे, एजाज शेख, हेमंत घोगरे, छगन मडावी, रोशन वालदे, प्रीतम वालदे, बजरंग बैस, हेमंत चंदनखेडे, ओमकार निमजे, रेहान पठान, जाफर पठान, मोईन खान, जयचंद सहारे, नासीर शेख, ताहीर शेख, इंन्द्रजीत ताराम, चिंतामन सहारे, दिपक मेश्राम, प्रदिप मानकर, प्रकाश कूमरे, प्रमोद मेश्राम, विनोद होळी, जयंत निमजे, लंकेश नंदनवार, राजू टेभूंर्णे, विलास कूमरे, राजू नागपूरे, लक्ष्मन मेश्राम, सूनिल हिरापूरे, धनसिगं नैताम तसेच मोठ्या संख्येत वाहन चालक बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here