The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), ४ ऑक्टोंबर : गेल्या चार ते पाच दिवसापासुन तालुक्यात वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्याने आणि पावसाने तहसील मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या कुंभीटोला गावातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
यंदा सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी केली. त्यानंतर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीची कामे पूर्ण केली. चांगले पीक येण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपले संपूर्ण भांडवल शेतीत गुंतवले होते. शेतकऱ्यांनी शेतात कष्ट करून पिके घेतली. त्यांना चांगले पीक येण्याची आशा होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून अचानक आलेल्या वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. याची दखल घेऊन शासनानी आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यवि अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यात महिन्याभरापासून जंगली हत्तींच्या कळपाने हैदोस घातलेला आहे त्याच्यातच आता गेल्या दोन दिवसापासून वादळी पावसामुळे ध्यान पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
