आंबेझरी येथे रानटी हत्तीने केलेल्या नुकसानीचे अर्थसहाय्य वितरीत

876

– आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते वितरीत
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ५ ऑगस्ट : तालुक्यातील आंबेझरी येथे २ ऑगस्ट रोजी रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकुळ माजवत १४ घरांचे नुकासान केले. शनिवार ५ ऑगस्ट रोजी नुकसानग्रस्तांना वनविभागाच्या वतीने आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हयात छत्तीसगड मार्गे प्रवेश केलेल्या हत्तीने गत वर्षीही अतोनात नुकसान केले. यंदाही हत्तीचा कळप गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्हयात धुमाकुळ माजवत शेतकऱ्यांचे व घरांचे नुकासान करत आहे. २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील आंबेझरी येथे हत्तीच्या कळपाने प्रवेश करत घरांचे नुकसान केले. मोठया प्रमाणात नुकसान केल्याने त्या नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत होती. आमदार कृष्णा गजबे यांनी विधीमंडळात ही मागणी लावून धरली असता वनमंत्री यांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वस्त केले होते. दरम्यान २ ऑगस्ट रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी पुराडा, क्षेत्र सहायक रामगड, बिट वनरक्षक आंधळी, कनिष्ठ अभियंता, तलाठा साजा पुराडा यांनी संयक्तरीत्या पंचनामे नोंदवून उपविभागीय वन अधीकारी कुरखेडा स्थित वडसा यांना चौकशी अहवाल सादर केला असता त्यांनी १३ नुकसानग्रस्तांना प्रत्येकी ५० हजार रूपये तर एका नुकसानग्रस्तास ४५ हजार रूपये असे एकुण ६ लाख ९५ हजार रूपये मंजुर केली.
आज ५ आगस्ट रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते नुकसान ग्रस्तांना मंजुर केलेल्या रकमेेचे धनादेश तसेच ताडपत्री व स्प्रे पंपाचे वाटप करण्यात आले. यावेळी धर्मविर सालविठ्ठल (भा.प.से) उपवनरक्षक वडसा वन विभाग, मनोच चव्हाण (म.व.से) उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा, बि.एस. डिगोळे (म.व.से) वनपरिक्षेत्र अधीकारी पुराडा, संजय कंकलवार क्षेत्र सहायक रामगड, सुरेश रामटेके बिट वनरक्षक आंधळी व इतर सर्व वन अधिकारी उपस्थित होते.

(the gadvishva, the gdv, gadchiroli, ambejhari, kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here