– तीन बिलियन व्ह्यूज पूर्ण करणारा भारतातला पहिला म्युझिक व्हिडिओ ठरला
The गडविश्व
मनोरंजनविश्व, ६ एप्रिल : युट्युब हे एक सामाजिक माध्यम आहे ज्याद्वारे अनेक व्हिडियो जनमानसापर्यंत पोहचत असते. अनेक व्हिडिओ युट्युबच्या माध्यमातून पहावयास मिळत असतात. टी सिरीजने १० मे २०२१ रोजी आपल्या युट्युबवर प्रकाशित केलेला ‘हनुमान चालीसा’ व्हिडिओ हा ३ बिलियन म्हणजेच ३०० कोटी व्ह्यूज पूर्ण करणारा भारतातला पहिला म्युझिक व्हिडिओ ठरला आहे. अशी माहिती टि सीरीज ने जाहीर केली आहे.
या व्हिडिओत टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हे स्वतः असून हे भजन हरीहरन यांनी गायले आहे. मूळ हनुमान चालीसा संत तुलसीदासांनी लिहिली होती.
टी सिरीज सध्या जगात सर्वाधिक यूट्यूब सबस्क्रायबर्स असलेलं चॅनल आहे. शिवाय इतरही त्यांची व त्यांच्याच अंतर्गत कंपन्यांची गाणी जास्त दिसून येतील.
