गडचिरोलीत उडाली पोलीस-नक्षल चकमक

252
File Photo

– एक नक्षली ठार झाल्याची माहिती
The गडविश्व
गडचिरोली, १ एप्रिल : जिल्हयातील छत्तीसगड सिमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील अबुझमाड जंगल परिसरात शनिवार १ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षलीस कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आल्याचे कळते.
गडचिरोली पोलीस दलाचे जवान भामरागड तालुक्यातील अबुझमाड जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांसोबत चकमक उडाली. ही चकमक काही वेळ चालली, दरम्यान पोलीसांचा वाढता दबाव बघता नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर परिसरात शोधमाहिम राबविली असता मोठया प्रमाणास नक्षल साहित्य व शस्तसाठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आल्याचे कळत असून यावेळी एका नक्षल्याचा मृतदेहही आढळून आल्याची माहिती आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) (Police-Naxal encounter broke out in Gadchiroli) (Bhamragad) (abujhamad)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here