कुरखेडा : घर जावयाला आजी सासुचा आला राग, चक्क गळाच चिरला

1004

– महिला गंभीर जखमी, गडचिरोलीत उपचार सुरू
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ३० मार्च : आजी सासूचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या घर जावयाने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरल्याची खळबळजनक घटना कुरखेडा तालुका मुख्यलायपासून जवळच असलेल्या आंधळी येथे बुधवारी रात्रो ११ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी सुनील कुमराज शेंडे (२८) रा. लेंढारी यास अटक करण्यात आली असून जखमी असलेल्या लिलाबाई मडकाम यांना कुरखेडा येथे प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते.
आरोपी सुनील शेंडे हा आपल्या पत्नीसह आंधळी येथील लिलाबाई मडकाम आजी सासुकडे राहत होते. सुनील हा दारू पिऊन नेहमी पत्नीशी भांडत होता. नेहमीच्या भांडनाने कंटाळून आजी लिलाबाई यांनी आरोपीला २८ मार्च रोजी घर सोडून जाण्यास सांगितले. त्यानंतर तो आपल्या गावी लेंढारी येथे निघून गेला मात्र बुधवारी परत रात्रो ११ वाजताच्या सुमारास अंधळी येथे पोहचला व दार ठोठावला असता पत्नीने दार उघडताच हातात चाकू धरून उभा होता. दरम्यान आजी सासूने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले असता राग अनावर झाल्याने संतापलेल्या सुनील ने अजीवर हल्ला करत तिचा गळा चिरला व आरडाओरड केल्याने तो तिथून पसार झाला. जखमी अजीवर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली असता पसार झालेल्या आरोपी सुनील विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार संदीप पाटिल यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शितल माने करीत आहेत.

(The gadvishva) (the gdv) ( kurkheda gadchiroli andhli) (crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here