ढाणकी येथे शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे पथसंंचलन

247

The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी (यवतमाळ) : ढाणकी शहरात होणाऱ्या रामनवमी व रमजान ईद या सणांमध्ये कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी बिटरगाव(बू) पोलीस प्रशासनाकडून शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी २९ मार्च रोजी रूट मार्च (पथसंचलन व रंगीत तालीम) काढून शहरातील जनतेला व नागरीकांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राम नवमी व रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यवतमाळ व उमरखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज २९ मार्च रोजी बिटरगाव(बू) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे उपस्थितीत आज शहरातील मुख्य मिरवणूक रस्त्याने रूट मार्च काढून शहरातील नागरिकांना धार्मिक सण व उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांनी शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here