The गडविश्व
चामोर्शी, १५ फेब्रुवारी : स्व.सुखदेवराव नैताम बहूउदे्दशिय संस्था चामोर्शीच्या वतीने बुधवार
१५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्थानिक नगर पंचायत सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराकरिता ज्ञानदीप अभ्यासिका चामोर्शी येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. यात सुशांत सोमनकर, विलास चिचघरे,
तेजस मेकर्तीवर, अमित पोगुलवार, शुभम समर्थ, आकाश नागापुरे, युद्धिष्टीर सुरजागडे, गणेश बारसागडे
यांचा समावेश आहे.
अभ्यास करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान हे श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य पुढे ठेवत रक्तदानाचा हक्क बजावला व आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांनी रक्तदानाकरिता इतरांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले. यावेळी अभ्यासिकाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

(The Gadvishva) (The Gdv) (Gadchiroli News Updates) (Blood Donate)