The गडविश्व
गडचिरोली, १३ फेब्रुवारी : लोह खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास गडचिरोली नजीकच्या सेमाना मार्गावर घडली. चेतन विस्तारी पोत्रजवार (२२) रा. काटली ता.जि. गडचिरोली आई अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मृतक हा एमएच इ३३ पी ३३८४ क्रमांकाच्या दुचाकीने सेमाना देवस्थान येथून नवस कार्यक्रम आटोपून गडचिरोली कडे परत येत होता. दरम्यान समोरुन येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाल्याची माहिती असून सदर अपघाताची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. सदर अपघाताने मृतकाच्या कुटुंबावर मोठा आघात पोहचला असून अनेकदा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅकने अपघात झाल्याने आता पुन्हा एकदा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचा प्रश्न उपस्थित होत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Road Accident)