गडचिरोली : प्रियसीवर बलात्कार करून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप

1144

– गडचिरोली अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, ४ फेब्रुवारी : प्रियसीवर बलात्कार करून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस गडचिरोली अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रदीप बालसींग हारामी रा. ढोलडोंगरी ह. मु. अंतरगाव ता. कोरची असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ०२ फेब्रुवारी २०१८ रोजी पोलीस स्टेशन कुरखेडा येथील सहा. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा किसन सहारे यांना डिप्राटोला ते तळेगाव जाणाऱ्या कच्चा रोडचे बाजुला एका महिलेचा मृत्यदेह मिळुन आल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी भेट दिली असता तिचा गळा हत्याराने अर्धवट चिरलेला आढळून आला. दरम्यान अनोळखी महिला मिळाल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. अधिक तपासात सदर महिले जवळ ट्रॅव्हल्सचे तिकीट मिळाल्याने त्या तिकीटावर बुकिंग करतेवेळी मोबाईल क्रंमाक टाकण्यात आला होता त्या मोबाईलचा एसडिआर काढले असता तो मोबाईल क्रमांक आरोपीच्या मित्राचा होता व त्याच्या मित्राला विचारपुस केली असता तो मोबाईल क्रमांक हा माझाच असुन तो मि माझा मित्र आरोपी प्रदीप बालसींग हारामी याला दिले होते असे त्याने सांगीतले असता त्या वरून आरोपीला ताब्यात घेवुन चौकशी केली . यावेळी त्याने सदर गुन्हा मिच केला आहे हे कबुल केले. मृतक हि पुणे येथे नौकरी करीत होती. ती आपल्या गावाजवळील कोटगुल येथील नियोजीत मंडई करीता पुणे येथुन आपले गावाकडे येत असतांना आरोपी याने ३१ जानेवारी २०१८ रोजी सुमारे ०५.३० वा. दरम्यान देसाईगंज येथुन सोबत आणुन डिप्राटोला व तळेगाव जाणाऱ्या कच्या रोडच्या बाजुला घेवुन गेला व त्या ठिकाणी मयता सोबत शाररीक संबंध करून मयत ही त्यास आपण लवकरात लवकर लग्न करू असा हट्ट करू लागली परंतु आरोपी हा यापुर्वीच त्याचे कॉलेच मधील मैत्रीनीशी प्रेमसंबंध असल्याने व मृतक ही तगादा लावत असल्याने आता काय करावे या विवंचनेतून आरोपीने मनात राग धरून तिचा गळा दाबला व ती मृत झाली किंवा नाही म्हणुन तिचा पुन्हा ब्लेडने गळयावर वार करून जिवानीशी ठार केले. याप्रकरणी आरोपीला ३ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक करण्यात आली. सरद प्रकरणात पोस्टे कुरखेडा अप.क्र. १३/२०१८ कलम ३२, ३७६ ( १ ) भादवी अन्वये गुन्हा नोद करण्यात आला. पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून तसेच प्रकरणातील परीस्थितीजन्य पुरावे लक्षात घेवुन शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोपी प्रदीप बालसींग हारामी रा. ढोलडोंगरी ह. मु. अंतरगाव ता. कोरची याला अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एम. मुधोळकर गडचिरोली यांनी कलम ३०२ भादवी मध्ये जन्मठेप व १ लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. व कलम ३७६ (१) अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास सपोनी/ गजानन पडळकर, पोस्टे कुरखेडा यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Vani Jayaram) (Everton vs Arsenal) (Man United vs Crystal Palace) (Wolves vs Liverpool) (JEE Mains Answer Key 2023) (Chelsea) (Life imprisonment for the accused who raped and killed his girlfriend
)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here