The गडविश्व
कोंढाळा (देसाईगंज), ८ जानेवारी : जुलै २०२२ मधे भारत सरकारच्या १० हजार शेतकरी उत्पादक संस्था (FPO) योजना अंतर्गत नाबार्ड व एनजीओ एनसीटी नागपूर च्या मार्गदर्शनात स्थापण झालेल्या देसाईगंज फार्मर प्रोड्युसर कंपनी कोंढाळा व नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढाळा येथे शुक्रवार ६ जानेवारी रोजी मूर्ती (NCT) यांच्या प्रमुख उपस्थितीत देसाईगंज मंडळ कृषी अधिकारी रुपेश मेश्राम, कृषी पर्यवेक्षक देशमुख, सर्व संचालक मंडळातील सदस्य उपस्थितीत डीएफपीसीएल मधील सर्व १० गावातील ७५० शेअर धारकांचे शेअर प्रमाणपत्र त्या-त्या गावातील संचालकाकडे वितरित करण्यात आले.
याप्रसंगी कंपनीची समोरची वाटचाल, येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत मंडळ कृषी अधिकारी रुपेश मेश्राम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विधाते यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पारधी यांनी केले. यावेळी एनसीटी महेश प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच मेश्राम, जय जयस्वाल, कंपनी चे सीईओ धोंगडे, अकाउंटंट मुंडले प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला तुळशी -कोकडी किन्हाळा/मोहटोला, शिवराजपुर, कुरुड, उसेगाव, फरी, कोंढाळा, नैनपूर येथील शेअर धारक शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
