– उपचारादरम्यान झाला मृत्यू, मानसिक तनावातून केली आत्महत्या
The गडविश्व
ता. प्र. / धानोरा, ७ डिसेंबर : मानसिक तनावातुन युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. छगन रोहिदास नैताम (१९) रा. सुरसुंडी ता.धानोरा असे आत्महत्या करणाÚया युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुरसुंडी येथील छगन नैमाम हा घरातील परिस्थितीमुळे मानसिक तनावात होता. दरम्यान सोमवारी त्याने विष प्राशन केले. तात्काळ त्याला मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. दरम्यान मंगळवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (suicide)