The गडविश्व
मूलचेरा, २६ ऑक्टोबर : तालुक्यातील श्रीरामपूर येथे पाच दिवस चालणाऱ्या महाकाली माता उत्सवास जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात महाकाली माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परिसरातील नागरिकांची महाकाली माता बद्दल मोठी श्रद्धा आहे. मूलचेरा तालुक्यातील श्रीरामपूर येथे पाच दिवस महाकाली उत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन दर्शन घेत जिल्हावासीयांकरिता माता चरणी आशीर्वाद मागितला.
