The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १९ ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाच्या वृध्द कलावंतांना मानधन योजनेला फरवरी २०२२ मध्ये मंजुरी मिळाली असून अजूनही एकाही कलावंतांना मानधन मिळालेला नसल्याने कलावंत त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जिल्ह्यातील काही पात्र कलावंतांनी आपापल्या परीने सर्व कागदपत्रे जोडून नोंदणी करुन घेतली होती . सदर योजनेला मंजुरी मिळून आठ महिने झाले तरी अजुनही मानधन मिळाले नसल्याने समाज कल्याण विभागाने याची दखल घेण्यात यावी व लवकरच मानधन देण्यात यावे अशी मागणी होत आहे.
