– समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आ.मा.जमात विद्यार्थी युवा संघटनेचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : स्थानिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली येथील कार्यालयासमोर आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने विविध मागण्याकरिता २० ऑक्टोबरपासून दोन दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
गडचिरोली येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध, अनावश्यक त्रास व इतर मागण्यांसाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
