The गडविश्व
अमिर्झा, १३ ऑक्टोबर : जि.प.उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे आज १३ ऑक्टोंबर २०२२ ला अमिर्झा बिटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खुर्सा च्या सरपंचा मंजुळाताई पदा, उद्घघाटक म्हणून गडचिरोली चे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, शा.व्य.स.अध्यक्ष राजेश मंगर , तमुस अध्यक्ष मनोज उरकुडे, विशेष अतिथी म्हणून गडचिरोली पं.स गशिअ उकंडराव राउत, शिक्षण विस्तारअधिकारी निखिल कुमरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेशिवनी केंद्र प्रमुख प्रभाकर बारशिंगे, अमिर्झा केंद्रप्रमुख किशोर चव्हाण, अमिर्झा केंद्र मुख्याध्यापक चित्ररेखा खोब्रागडे, आंबेशिवणी केंद्र मुख्याध्यापक सुरेश बांबोळकर, फुलोरा गडचिरोली तालुका समन्वयक कुमारी कल्पना लाडे उपस्थित होते.
कार्यक्रची सुरवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथील विद्यार्थ्यांच्या सुमधुर स्वागत गीताने झाली. उदघाट्न म्हणून लाभलेले धनंजय साळवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मिशन नवचेतना, ज्ञानरचनावाद, फुलोरा या उपक्रमातुन गुणवंत्ता वाढते, याबद्दल, शिक्षकच चांगला विद्यार्थी घडवितो. त्यासाठी शिक्षकांनी सचोटीने विद्यर्थ्यांना शिकवावे, त्यांचप्रमाणे शाळेच्या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन उपक्रम राबवावे असे मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी देशाचा विकास शिक्षण घेतल्याने होते याकरिता सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले पाहिजे यासाठी फूलोरा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी निखिल कुमरे यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन केले. श्रीमती संगीता लाकडे, प्रसाद श्रीरामे, विनोद मडावी, सागर आत्राम, समीर भजे, सुरेश बांबोळकर, श्रीमती कल्पना लाडे, किशोर चव्हाण, प्रभाकर बारशिंगे ज्ञानरचनावाद, अनुभवात्मक अध्ययन, खेळाधारीत अध्यापन व तंत्रज्ञान,स्वयंअध्ययन, फुलोरा कृतीयुक्त अध्ययन विषयनिहाय पाठाचे सादरीकरण केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर उईके, अविनाश येनप्रेडीवार, निवास कोडाप, जगन्नाथ हलामी,खुमेंद्र मेश्राम, अमोल जोशी, नूर पठाण, सचिन मेश्राम, आशिष बांबोळे, पायल गावंडे यांनी प्रयत्न केले.
सुत्रसंचालन तथा आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथील मुख्याध्यापक सुरेश वासलवार तसेच आभार जगदिश मडावी यांनी केले. कार्यक्रमास अमिर्झा तसेच आंबेशिवणी केंद्रातील शंभर शिक्षक उपस्थित होते.
