– सावली व जांभळी येथे मॅराथॉन स्पर्धा
The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : गावातील अवैध दारूविक्री विरोधात शक्तिप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कोरची तालुक्यातील सावली व जांभळी येथे मुक्तिपथ मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही गावातील एकूण ८२ महिला, पुरुष व युवक-युवतींनी दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेत सहभाग घेतला होता.
सावली येथे आयोजित मुक्तीपथ मँरेथान स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात महीला २०, पुरुष,४, युवक १७ व ४ युवतीचा समावेश होता. या स्पर्धेची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच सुनील सयाम यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गाव संघटनेचे अध्यक्ष तेजलाल सिंद्राम होते. यावेळी राध्येशाम मडावी, प्रभुदास लाडे, मनोहर मेश्राम, नरेश मडावी, गोपाल मेश्राम, गीता मेश्राम, इंदिरा सिंद्राम, दुर्गा मेश्राम, मुख्याद्यापक केरामी, सहायक शिक्षक मिसरा, आंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका उपस्थित होते. विविध गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम आलेले विष्णु सिंद्राम, रघुनाथ मेसराम, निलम कुमरे, समारीन नैताम यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार मनोहर मेश्राम यांनी मानले.
जांभळी येथील स्पर्धेचा शुभारंभ सनु मडावी यांच्याहस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावसंघटनेचे सचिव सुधाराम मडावी होते. यावेळी ग्रामसभा अध्यक्ष ईश्वर कुमरे, ग्रामसेवक आर.जे.दिहारे, मुख्याध्यापिका पी.आर.बूद्धे, त्रिवेनी गायकवाड, एस.के.लांडगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत ३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक पटकाविले युवक विनोद उसेंडी, युवती अंजली कोरचा, महीला विभा कोरेटी, पुरुष सहाजु हिडामी यांचा मुक्तिपथ गाव संघटनेच्या वतीने मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, स्पर्धेचे रूपांतरण सभेत करून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन गाव संघटनेचे अध्यक्ष सुनील मडावी यांनी केले. दोन्ही स्पर्धांचे नियोजन मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके व स्पार्क कार्यकर्ता सुभम बारसे यांनी केले.
