The गडविश्व
गडचिरोली, १ ऑक्टोबर : अभाविप तर्फे जिल्ह्यातील विविध प्रवर्गातील शिष्यवृत्ती व वस्तीगृह विषयातील प्रलंबित विषय सोडविण्याबाबत समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांची संपर्क साधल्यानंतर शिष्यवृत्ती व वस्तीगृह संदर्भातील काही समस्या आढळून आल्या. त्यासंदर्भात विविध मागण्या करीता निवेदन देण्यात आले.
यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील शिष्यवृत्ती तसेच SC, VJNT, SBC यांची प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती तात्काळ वर्ग करण्यात यावी, जिल्हयातील वस्तीगृह व वस्तीगृह बाह्य विद्यार्थी यांची विद्यावेतन हे गेल्या दोन वर्षापासून थकीत आहे ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सुपूर्द करण्यात यावे, गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना नंतर परिस्थिती सामान्यता झालेली आहे त्याकरिता जिल्ह्यातील सर्व वस्तीगृह हे पूर्ववत करण्यात यावी तसेच या वस्तीगृहामध्ये भोजन व इतर अन्य सुविधा जसे ग्रंथालय, शैक्षणिक साहित्य, खेळण्याचे साहित्य व त्यातील सुविधा या पूर्ववत कराव्या, महाराष्ट्रातील दहावी व बारावी याचे निकाल लागलेले आहे तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर राज्यात शिकणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र याचे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे, सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता येत्या 1 महिन्यात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खाता मध्ये जमा करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच मागणी पूर्ण ना झाल्यास अभाविप तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येतील असा इशारा सुद्धा देण्यात आला.
निवेदन देतांना जिल्हा संयोजक चेतन कोलते, संतोष पिपरे, मुन्ना चौधरी, शितल कुडवे, कृष्णली पोटावी, अंकिता बोरकर व अभाविप कार्यकर्ता उपस्थित होते.
