The गडविश्व
ता. प्र / धानोरा , २० सप्टेंबर : तालुक्यातील रांगी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन आज २० सप्टेंबर २०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीचे प्रशासक शशिकांत साळवे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली प्रशासक सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड, प्रमुख अतिथी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) विभाग गडचिरोली अनिल सोमनकर, रांगी च्या सरपंचा सौ. फालेश्वरीताई प्रदिप गेडाम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायकराव किरगे, सामाजिक कार्यकर्ता देवराव कुनघाटकर, प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. ताराम, रांगी ग्रामपंचायत सचिव पी .एस .बुराडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष लक्ष्मीताई आतला आदी मान्यवर उपस्थित होते.
२० ते २२ सप्टेंबर या तीन दिवस चालनाऱ्या क्रीडा संमेलनात रांगी केंद्रातील ९ शाळा सहभागी आहेत त्यात, रांगी , कुरंडीमाल, मुरमाडी, मुरूमगाव, भाकररोडी, जपतलाई, सावरगाव, सोडे, परसवाडी येथील अंदाजे ६५० ते ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजय आखाडे यांनी केले. संचालन मारोति कुनघाटकर शासकीय आश्रम शाळा रांगी यांनी तर आभार वाणी यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी क्रीडा प्रमुख सोमानकर यांचेसह केंद्रातील सर्वच शाळेचे शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
