गडचिरोलीत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : पोलीस दलाची भव्य तिरंगा बाईक रॅली, दुर्गम भागांमध्येही ध्वजारोहण

66

The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या प्रसंगी, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित ०७ पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच नुकतीच पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. शहिद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

नवजीवन वसाहतीत आत्मसमर्पित माओवाद्यांसोबत ध्वजारोहण

नवजीवन वसाहतीत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. मिठाई वाटप करून त्यांच्यात संविधानाप्रती आदर जागविण्याचा संदेश देण्यात आला.

राज्यमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते भव्य तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ

पोलीस मुख्यालय ते इंदिरा गांधी चौक या मार्गावर तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली.
300 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी असलेल्या या रॅलीला खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार अशोक नेते, आमदार मिलींद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.

गिरीधर तुमरेटीचा आत्मसमर्पणानंतर पहिल्यांदाच मूळगावी स्वातंत्र्य दिन साजरा

गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. आज त्याने पहिल्यांदा मूळगाव मौजा जवेली खुर्द येथे ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन संविधानाप्रती आदर व्यक्त केला.

दुर्गम भागात काळ्या झेंड्यांच्या मनसुबे उधळले

माओवादी संघटना स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे फडकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, गडचिरोली पोलीस दलाने सर्व प्रयत्न हाणून पाडत, दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये ध्वजारोहण करून कार्यक्रम यशस्वी केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांनी मर्दहूर गावात पोलीस पथकासह ध्वजारोहण करून ग्रामस्थांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

जनजागृती उपक्रम आणि पहिल्यांदाच नेलगुंडा, कवंडे पोस्टांवर ध्वजारोहण

पोस्टे/उपपोस्टे/पोलीस मदत केंद्रांवर शालेय रॅली, अंमली पदार्थ विरोधी शपथ, मिरवणुका आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या नेलगुंडा व कवंडे पोस्टांवर प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोस्टे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्र येथे 79 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या वातावरणात आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागात पार पडला.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #स्वातंत्र्यदिन #तिरंगारॅली #गडचिरोलीपोलीस #ध्वजारोहण #माओवादीआत्मसमर्पण #देशभक्ती #शौर्यपदक #दुर्गमभाग #जनजागृती #Gadchiroli #IndependenceDay #TirangaRally #GadchiroliPolice #FlagHoisting #MaoistSurrender #Patriotism #GallantryMedal #RemoteAreas #AwarenessCampaign

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here