– मोठा शस्त्रसाठा जप्त, काही नक्षली जखमी असल्याची शक्यता
The गडविश्व
नारायणपूर, दि. २४ : छत्तीसगडच्या नारायणपूर, बिजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तसेच महाराष्ट्राच्या सीमेलगत अबुझमाड परिसरात पोलीस नक्षल चकमक २३ मे रोजी सकाळच्या सुमारास उडाली. या चकमकीत ७ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
छत्तीसगड पोलिसांच्या रडारवर नक्षली असून मोठ्या प्रमाणात करावाया करण्यात येत आहे. प्लालाटून क्रमांक १६ आणि इंद्रावती एरिया कमेटी चे काही नक्षली सीमावर्ती भागात असल्याच्या सूचना मिळाली असता पोलीस
पोलीस दल संयुक्त शोधमोहीम राबवित असताना अबुझमाड परिसरात नक्षल्यांशी चकमक उडाली. या चकमकीत ७ नक्षली ठार झाले असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. पोलीस दलाने ठार झालेल्या नक्षालींचे मृतदेह तसेच घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
(#thegdv #blooddonetcamp #thegadvishva #cgnews #cgpolice #bijapur #naraynpur #naxal #abujhamad #abuzamad )
