– धानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय यश
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०६ : तालुक्यातील रांगी केंद्रातील एकूण सहा विद्यार्थी जिल्हा परिषदपूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून तालुक्याचा मान उंचावला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
पात्र विद्यार्थ्यांमध्ये पी.एम. श्री रांगी जिल्हा परिषद शाळेतील कुमारी श्रद्धा नीलकंठ आंबेकर हिने विशेष यश मिळवले आहे. यासोबतच कन्हाळगाव येथील चिऊताई रवींद्र काटेंगे आणि लावण्य प्रदीप परसे, निमगाव येथील दीपिका निरंजन धुर्वे, तसेच मिचगाव येथील पवन लोमेश पदा आणि राजेशाम भास्कर धुर्वे या विद्यार्थ्यांचाही शिष्यवृत्तीसाठी समावेश आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या यशामुळे तालुक्यात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
