चकमकीत ५ नक्षली ठार ; १ कोटीच्या नक्षल्याचा समावेश

116

– चकमकीनंतर पाचही नक्षलवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी घेतले ताब्यात
The गडविश्व
बीजापूर (छ.ड) दि. ०७ : इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी करत ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश मिळवले आहे. या कारवाईत केंद्रीय कमिटी सदस्य व १ कोटींचा इनामी नक्षलवादी सुधाकर उर्फ गौतम यासह तेलंगणा कमिटीचा सदस्य भास्कर याचाही समावेश आहे. चकमकीनंतर पाचही नक्षलवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत.
सुरक्षा दलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई ५ ते ७ जून दरम्यान करण्यात आली. ५ जून रोजी पहिली मुठभेड झाली, त्यानंतर सुधाकरचा मृतदेह सापडला. सुधाकर हा दंडकारण्य क्षेत्रातील नक्षल शिक्षण विभागाचा प्रमुख होता. तो सुट्टीवरून परत जंगलात परतल्यावरच झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याच्यावर सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
यानंतर ६ जून रोजी तेलंगणा स्टेट कमिटीशी संलग्न असलेला कमांडर भास्कर देखील झालेल्या मुठभेडीत ठार झाला. भास्कर हा मंचेरियल कोमाराम भीम (एमकेबी) विभागीय कमिटीचा सदस्य व सचिव होता. त्याच्यावर ४५ लाखांचे बक्षीस होते. तो आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील रहिवासी होता.
६ व ७ जूनच्या दरम्यान रात्री झालेल्या कारवायांमध्ये आणखी तीन नक्षलवादी ठार झाले. त्यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ७ जून रोजी झालेल्या अंतिम चकमकीत दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. सध्या या पाच नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
एनकाउंटरच्या ठिकाणाहून दोन AK-47 रायफल्स, मोठ्या प्रमाणात गोळाबारूद व नक्षली दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या ऑपरेशनदरम्यान काही जवानांना साप व मधमाश्यांनी चावा घेतला. सुदैवाने सर्व जवान आता धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संपूर्ण ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी धाडसाने कामगिरी करत नक्षल चळवळीला मोठा हादरा दिला आहे. ठार झालेले दोन्ही इनामी नक्षलवादी दंडकारण्यात दीर्घकाळ सक्रीय होते आणि नक्षली धोरणनिर्मितीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here