नवरगाव ग्रामपंचायत हद्दीत ३२७ वृक्षांची लागवड

18

– सामूहिक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २३ : पर्यावरण संरक्षण आणि हरित गाव निर्मितीसाठी धानोरा पंचायत समितीच्या वतीने दिनांक २२ जुलै रोजी नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. नवरगाव, राजोली, भुरानटोला आणि येरंडी या गावांमध्ये रस्त्याच्या कडेला, शालेय परिसरात आणि सार्वजनिक जागांमध्ये एकूण ३२७ झाडांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात करंजी, सिताफळ, जांभूळ, आवळा अशा विविध जातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्षलागवडीदरम्यान ग्रामपंचायत नवरगावच्या सरपंच सौ. रंजनाताई विजय शिडाम, ग्रामसेवक खुशाल नेवारे, सदस्य कपिल कोवा, साईनाथ गेडाम, रेश्मिला मडावी, बिसन हलामी, सौ. रंजनाताई नरोटे (मोबिलायझर), सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक लोमेश कोकोडे, मोरेश्वर उसेंडी, प्रमोद मडावी, संगणक चालक आशिष सेकृतीवर, आशा वर्कर सौ. शालू बोरुले, आरोग्य सेविका सौ. हजारे मॅडम, कृषी सखी जास्वंदा पदा आणि गावातील नागरिक, महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्व उपस्थितांच्या एकत्रित प्रयत्नांतून झालेली ही वृक्षलागवड केवळ एक उपक्रम न राहता पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here