– घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे-दारुगोळा जप्त
The गडविश्व
विशेष प्रतिनिधी / बस्तर, दि. १७ : चिंताकोंटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी सुरक्षा दलांनी राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान कोलमल पाड जंगल परिसरात झालेल्या चकमकीत २ महिलांसह ३ नक्षली ठार झाले. १६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या या कारवाईनंतर शोध मोहिमेदरम्यान जवानांना तिन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले असून, घटनास्थळावरून एक ३०३ रायफल, व्हीजीए लाँचर, कारतूस आणि इतर दारुगोळ्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली. ठार करण्यात आलेल्या नक्षलींवर एकूण १५ लाख रुपयांचे सामूहिक बक्षीस घोषित होते. यामध्ये कुख्यात माडवी देवा (एरिया जनमिलिशिया कमांडर व स्नायपर टीम कमांडर), पोडियम गंगी (एरिया CNM कमांडर) आणि सोड़ी गंगी (एरिया कमिटी सदस्य – ACM) यांचा समावेश असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.https://x.com/ANI/status/1990063579681394921?s=19
भेज्जी–चिंतागुफा सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांची हालचाल आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरजी पथकाने १६ नोव्हेंबरला सकाळी शोध मोहीम सुरू केली. दरम्यान तुमलपाड परिसरातील दाट जंगलात नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केल्याने जवानांनी तत्काळ प्रतिउत्तर देत मोहीम तीव्र केली. जवळपास संपूर्ण सकाळपासून दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू राहिला आणि शेवटी तिन्ही नक्षली ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. या कारवाईनंतर परिसरात अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली असून, भागात गस्त आणि तपासणी अधिक वाढविण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
#thegdv #thegadvishva #BastarEncounter #NaxalOperation #Chintakonta #DRGAction #AntiNaxalCampaign #SecurityForces #Naxalites #ChhattisgarhNews #BreakingNews #GadchiroliRegion #PoliceOperation #NaxalEncounter














