मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोलीच्या माध्यमातून आंबेशिवणी येथे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न

86

The गडविश्व
गडचिरोली, ३१ जुलै : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशच्या सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी या गावात २९ जुलै रोजी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाअंतर्गत मुलांना त्यांच्या अध्यापनात सहकार्य मिळावे, मुलांचा शिक्षणात रस कायम राहावा व त्यांना शाळेतील अध्यापन करण्यासाठी मदत मिळावी या हेतूने मॅजिक बस संस्थे तर्फे खालील साहित्याचे वितरण करण्यात आले. त्या शैक्षणीक साहित्यामध्ये बॅग, नोट बुक, चित्रकला वही, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, रंगकांडी बॉक्स, स्केल, रंगीत पेपर बॉक्स, खडू बॉक्स, पेन, ब्लॅक बोर्ड वरील सर्व साहित्याची किट बनवून मुलांना वितरण करण्यात आले.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील १२०० मुलांसाठी “खेळाच्या माध्यमातून विकास ” हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत जीवन कौशल्य – संवाद कौशल्य, गट कार्य, समस्या सोडविणे, शिकण्यातुन शिकणे, स्व-व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण (सी एल सी) द्वारे विज्ञान, गणित, इंग्लिश आदी कार्यक्षेत्रावर काम करीत आहे . सदर कार्यक्रम हा मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फायदेशीर असून १२ ते १६ वयोगटातील मुलामुलींसाठी गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आंबेशिवणी ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. सरिताताई टेंभूर्णे, विशेष अतिथी म्हणून शा.व्य.स अध्यक्ष हरिदास म्हस्के, उपसरपंच योगेंद्र कुळवे, पोलीस पाटील देवेंद्र भैसारे, स.ग्रा.प टीकाराम झंजाळ, तमुस अध्यक्ष मोहन पाल, स. ग्राम प्रशांत भैसारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देवराव काळबांधे, मुख्याध्यापक बांबोळकर, विद्याभारती हायस्कूल आंबेशिवणीचे मुख्याध्यापकी खरवडे, सागर आत्राम, कातरकर, मेश्राम, शेख, निलेकर, चुदरी, घुघूसकर, वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा प्रशांत लोखंडे हे उपस्थित होते. या दरम्यान मान्यवरांनी योग्य मार्गदर्शन केले व शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे, समुदाय समन्वयक दिवाकर सोनबावणे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने व कार्यक्रम व्यवस्थापक गडचिरोली देवेंद्र हिरापूरे यांच्या सहकार्याने संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here