धक्कादायक : हतबल आईने पोटच्या मुलास दीड हजारात विकले

70

– महाराष्ट्राला सुन्न करणारी वेदनादी घटना

The गडविश्व
जळगाव, २९ जुलै : महाराष्ट्राला सुन्न करणारी वेदनादी घटना पुढे आली आहे. कोरोनात पती गेल्यानंतर भीक मागूनही मुलांचे पोट भरता येत नसल्याने हतबल झालेल्या एका आईने आपल्या पोटच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोना काळात अंमळनेरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबावर संकट ओढावले. दरम्यान कुटुंबातला कमावता व्यक्ती गेल्याने संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले. पदरात सात मुलं आणि आर्थिक परिस्थिती बिकट असे दुहेरी संकट या महिलेवर ओढावले. पती गेल्याचे दु:ख कमी की काय सात मुलांचे पोट भरणार कसे ही चिंताही तिला सतावत होती. अखेर नाईलाजास्तवर या महिलेने आपले अडीच वर्षांचे बाळ एका व्यक्तीला अवघ्या दीड हजारात विकले. लहान बाळाच्या विक्रीची माहिती अमळनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. व तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने सांगितलेली कहाणी ऐकून पोलिसही हळहळले. पोलिसांनी त्या व्यक्तीकडून बाळ परत घेतले असून त्या बाळासह इतर सहा भावंडांना बाल कल्याण समितीच्या स्वाधीन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here