व्यसनाचे दुष्परिणाम कळतात ३० जणांनी घेतला उपचार

44

The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : दारूच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात येताच बांडे व वाघोली येथील ३० रुग्णांनी गाव पातळी व्यसन उपचार शिबिराच्या माध्यमातून उपचार घेतला.
चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला एकूण २० रुग्णांनी भेट देऊन पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी केले असून केस हिष्ट्री संयोजक प्रमोद कोटांगले यांनी घेतली. तसेच छत्रपती घवघवे यांनी रुग्णांना समुपदेश केले. सहकार्यासाठी सरपंच सोनी किरमे, काशीनाथ बारसागडे, नितीन मानकर, संदीप उराडे, गणेश पोरटे उपस्थित होते.
एटापल्ली तालुक्यातील बांडे येथे आयोजित शिबिराचा एकूण १० रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी संयोजिका पूजा येल्लूरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक समजावून सांगितले. समुपदेशक साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांना दारूची सवय कशी लागते, व्यसनांचे दुष्परिणाम, शरीरावर दिसून येणाऱ्या बदलाबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. या शिबिराचे नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार व प्रेरक रवींद्र वैरागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य पोलीस पाटील पेका गुंडारू , गाव भुमिया सैनू गुंडारू, रामजी गुंडारू, आशा वर्कर मीना मटामी, अंगणवाडी सेविका मुनी तिगा यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here