४३ रुग्णांनी घेतला तालुका क्लिनिकचा लाभ

32

The गडविश्व
गडचिरोली, १७ जुलै : जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, मुलचेरा व एटापल्ली या तालुका मुख्यालयात मुक्तिपथ तर्फे अयोजित क्लिनिकचा एकूण ४३ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी रुग्णांवर औषोधोपचार करीत समुपदेशन सुद्धा करण्यात आले.
दारूमुक्त होण्याची इच्छा असलेल्या जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे नियोजित दिवशी तालुका मुख्यालयी क्लिनिकचे आयोजन केले जाते. सोमवारी गडचिरोली मुक्तीपथ तालुका कार्यालयात 6, आरमोरी ४ , बुधवारी देसाईगंज क्लिनिकमध्ये १७, गुरुवारी मुलचेरा ४ व एटापल्ली १२ अशा एकूण ४३ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
क्लिनिकला येणाऱ्या रुग्णांना दारूचा व्यसनातून बाहेर पडण्यास मदत व्हावी, यासाठी औषोधोपचारासह समुपदेशन देखील करण्यात येते. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत समुपदेशन करण्यात आले. केस हिष्ट्री घेत रुग्णांना दारूचे दुष्परिणाम सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here