‘सर्च’ गडचिरोलीत कर्करोग ओपीडीला उत्कृष्ट प्रतिसाद

91

– ३० जुन २०२२ ला झालेल्या प्रथम कर्करोग ओपीडी मध्ये नागपूरचे प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. सुशील मांनधनिया यांनी २१ रुग्णांची केली तपासणी

The गडविश्व
गडचिरोली : गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोग वर उपचार घेता येणं कठीण होत. परंतु कॅन्सरच्या वाढत्या संख्येमुळे ‘सर्च’ गडचिरोलीत कॅन्सरची ओपीडी सुरू करण्यात आली. ३० जुन २०२२ ला प्रथम कर्करोग ओपीडी आयोजीत करण्यात आली होती व ह्या ओपिडी मध्ये थायरॉईड, तोंडाचा कर्करोग, स्तंनाचा व गर्भमुखाचा कर्करोग असलेल्या २१ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आला. कर्करोगाच्या रुग्णांची संख्या बघता आता हि ओपीडी नागपूरचे प्रसिद्ध तज्ञ डॉ. सुशील मांनधनिया दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सर्च येथे पुरवतील.
कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे आणि तो विविध कारणांमुळे विविध प्रकारचा असू शकतो. कॅन्सर फक्त तंबाखू खाणाऱ्या किंवा चघळणाऱ्यां मध्येच होतो असे नाही तर हा आजार आता स्तनाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारांमध्ये दिसून येतो. स्तनाचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे श्वास लागणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.जर या पैकी कोणतेही लक्षणे आढडुन आल्यास सर्च येथील दवाखान्यात दर महिन्याचा तिसऱ्या गुरुवारी (२१ जुलै) असलेल्या कर्करोग ओपीडी ला येऊन तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सर्च च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here