तामिळनाडू येथील प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी यांची गुरवळा नेचर सफारीला भेट

56

– ४७ प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली भेट

The गडविश्व
गडचिरोली २ जुलै : तामिळनाडू फॉरेस्ट अकॅडमी कोईमतूर येथील ४७ प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गडचिरोली येथील गुरवळा नेचर सफरीला नुकतीच भेट दिली.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या गुरवळा जंगल परिसरात नेचर सफारी सुरू करण्यात आली.
या नेचर सफरीला तामिळनाडू फॉरेस्ट अकॅडमी कोईमतूर येथील ४७ प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी भेट दिली. तसेच वन विभाग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या गोंडवाना हर्ब येथे भेट दिली व गोंडवाना हर्ब अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. प्रशिक्षणार्थींना गोंडवाना हर्ब मध्ये तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वनौषधींची माहिती देण्यात आली तसेच शिल्प ग्राम येथे भेती दरम्यान शिल्प ग्राम मध्ये सुरू असलेल्या युवकांच्या प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात आली. गुरवळा नेचर सफारी येते प्रशिक्षणार्थींना नेचर सफारी बाबत माहिती देण्यात आली व नेचर सफारीमुळे वनांचे संरक्षण व संवर्धन झाले सोबत स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध झालेला आहे असे सांगण्यात आले. तामिळनाडू फॉरेस्ट अकॅडमी कोईमतुर येथील मनोज के व दिलीपण यांच्या नेतृत्वात ४७ प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्राधिकारी यांनी भेट दिली. प्रशिक्षणार्थींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील २२ व उत्तर प्रदेश राज्यातील २५ प्रशिक्षणार्थी होते . गडचिरोली वनविभाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. प्रशिक्षणार्थींना गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणाला संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुरवळा चे अध्यक्ष निलेश गेडाम व संयुक्त व्यवस्थापन समिती हिरापूरचे अध्यक्ष रमेश मेश्राम, गडचिरोलीचे क्षेत्र सहाय्यक श्रीकांत नवघरे, गुरवळा चे वनरक्षक गुरु वाढई यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here