पेंढरी ते धानोरा मार्गावरील पुलावर खड्डे ; पहिल्याच पावसात झाली दुर्दश्या

209

– बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह ?

The गडविश्व
पेंढरी : धानोरा तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन निर्माण करण्यात आलेल्या पेंढरी, मुंगनेर,चव्हेला या मार्गावरील डांबरीकरन व पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पहिल्याच पावसात दुर्दश्या झाली आहे.
चार महिन्यापुर्वी धानोरा तालुक्यातील पेंढरी,मुंगनेर,चव्हेला या मार्गावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण व पुलांचे बांधकाम करण्यात आले. या मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली होती. मात्र चार दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे या मार्गावरील चिमरीकल गावाजवळचा पुल खचला व डांबरीकरणाला जागोजागी भेगा अन खड्डे पडलेले आहेत. यामुळे या संपूर्ण बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ऊभे ठाकले आहे. तशी संबंधित विभागाने याची दखल घ्यावी व अशा निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here