जि. प. हायस्कूल धानोरा येथे नवागताचे स्वागत व पुस्तक, गणवेश वितरण

120

The गडविश्व
ता.प्र / धानोरा : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे आज बुधवार २९ जून रोजी वर्ग ५ ते १२ वी मध्ये प्रवेशित नवोदित विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डी. टी. कोहाडे, प्रमुख अतिथी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली धामणे, पं.स. धानोराचे गटशिक्षणाधिकारी वी. आर. अरवेली होते.कार्यक्रमाची सुरवात बँड पथकाद्वारे नवोदित विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच पुस्तके शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांचे हस्ते वाटप करण्यात आले. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी गीतगायन केले तसेच एकल नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन पी. बी. तोटावार यांनी केले तर आभार पी.वी.साळवे यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोल्हटकर , बुरमवार, देवकाते, रत्नागिरी, बादल वारघंटीवार , रजनी मॅडम, डोके, कोरेवार मॅडम, निनावे मॅडम, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here