१ लाखांचा मुद्देमाल नष्ट, दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

528

-मोहझरीत गडचिरोली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी जंगलपरिसरात मुक्तिपथ व गडचिरोली पोलिसांनी शोधमोहीम राबवून १ लाख ४ हजारांचा मोहफूलाचा सडवा व साहित्य नष्ट केले. तसेच घरातून देशी व मोहफुलाची दारू जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहझरी येथे अवैध दारूची विक्री केली जाते. विशेष म्हणजे, मोहफुलाची दारू मोठ्या प्रमाणात काढली जाते. काही विक्रेते देशी व विदेशी दारूचीही विक्री करतात. या परिसरातील काटली, साखरा, पोर्ला, नवरगाव, नगरी व इतर गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी मोहझरी गावात येतात. गावात मोठ्या प्रमाणात दारूविक्री केली जात असून विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी गाव संघटनेने केली होती. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने मोहझरी शेतशिवारात, जंगलपरिसरात व गावामध्ये शोधमोहीम राबविली. या मोहिमेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आढळून आलेला 28 पांढरे पोते मोहफुलाचा सडवा व दारू काढण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले.
दरम्यान, मोहझरी येथील संतोष मनोहर शेंडे याच्याकडून मोहफुलाची दारू व काटली येथील तुमचंद मडावी याच्या घरातून 50 देशी दारूच्या नीपा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नापोशि धनराज चौधरी, स्वप्नील कुळवले, संजय कांबळे, पोशि सुजाता ठोंबरे, मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवणाथ मेश्राम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here