गडचिरोली जिल्ह्यात आज ८ कोरोनामुक्त तर एका बधिताची नोंद

30
जाहिरात

– सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता २७

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात आज 650 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 01 असून कोरोनामुक्ताची संख्या 08 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37473 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36673 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 27 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.87 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.07 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये धानोरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 04,धानोरा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 01 तसेच वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here