माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते बंदुकपल्ली येथे माता मंदिर चे उद्घाटन

111
जाहिरात

The गडविश्व
मुलचेरा : तालुक्यातील ग्रामपंचायत कोटारी अंतर्गत येत असलेल्या बंदुकपल्ली येथे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते माता मंदिरचे उद्घाटन करण्यात आले.
बंदुकपल्ली येथे माता मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती, गांवात माता मंदिर होते परंतु लाकडा पासून ते तयार केले होते, प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असो अथवा सण उत्सव असो तसेच सामाजिक कार्यक्रम असल्यास सर्वप्रथम माता मंदिरात पूजा करूनच इतर कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र माता मंदिर व्यवस्थित नसल्याने बंदुकपल्ली येथील सर्व समाज बांधवांनी गांवात बैठक घेवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे माता मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता कंकडालवार यांनी शासनाकडून माता मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होत नाही. मात्र मी माझ्या स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिली व बांधकामहि पूर्ण झाले असल्याने आज सदर माता मंदिरचे उदघाटन माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते रीतसर पूजा करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.प.कोठारीच्या सरपंचा रोहिणी कुसनाके, चलावार, ग्रा.प. सरपंच तेलामी, साधना मडावी ग्रा.प.चुटुगुंटा उपसरपंच सुरेश आत्राम, व्यकटेश धनोरकर, जीवनकला तलांडे ग्रा.प.सदस्य, अडपल्ली ग्रा.प.माजी उपसरपंच निमसरकार, पोलीस पाटील मडावी, कालिदास, मुलचेरा चे नगरसेविका कुसनाके, विनोद झाडे, प्रभास, बंडुभाऊ आलाम, कमलेश, तसेच समस्त गावकरी नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here