चांदाळा परिसरातील तीन हातभट्या उध्वस्त

61
जाहिरात

– दीड लाखाचा मुद्देमाल नष्ट
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील चांदाळा-कुंभी नाल्यालगत सुरु असलेल्या हातभट्ट्यांवर धाड टाकून ४० ड्रम मोहफुलाच्या सडव्यासह दीड लाखाचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई मुक्तिपथ तालुका चमू व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तरित्या शनिवारी केली.
चांदाळा गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जाते. या गावांच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरासह इतर गावात सुद्धा दारू पुरविल्या जाते. सोबतच गावात मद्यपींची लाईन लागलेली असते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. चांदाळा-कुंभी नाल्यालगत दारू गाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहफूलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली.
प्राप्त माहितीच्या आधारे मुक्तिपथ तालुका चमू व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तरित्या चांदाळा जंगलपरिसरात व नाल्यालगत शोधमोहीम राबवत तीन दारूअड्डे उध्वस्त केले. तसेच ४० ड्रम व १५ मडके मोहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य, १२ मोठ्या कतल्या असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवदास दुर्गे, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here