किसनयेलि येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न

191
जाहिरात

The गडविश्व
ता.प्र / धानोरा :  पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती अंतर्गत येत असलेल्या किसनयेलि येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याला अध्यक्ष म्हणून देवसुर चे सरपंच पुरणशहाजी कुमरे, तर उद्घाटक म्हणून किसनयेली चे गावपाटील धनीराम कोंमरा, प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ बटालियन ११३ कँम्प ग्यारापती चे अजय कुमार लकडा, ल पोलीस मदत केंद्र ग्यारपतीचे प्रभारी अधिकारी गणेश आठवे, पोलीस उपनिरीक्षक शकैलास माळी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. सदर मेळावा उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय धानोराच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून मेळाव्यात पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेविषयी नागरिकांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. सदर जनजागरण मेळाव्यात ई-श्रमकार्ड ५९, सातबारा-41, पँनकार्ड -२, ३५ महिलांना उन्हापासून संरक्षण म्हणून स्टोलचे वाटप, २० वयोवृद्ध नागरिकांना धोतर वाटप, ३० शेतकऱ्यांना विळ्याचे वाटप इत्यादी साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. नक्षल आत्मसमर्पण योजनेविषयी माहिती बॅनर लावून प्रत्यक्ष गावकऱ्यांना देण्यात आली तसेच नक्षल सदस्य असलेल्या कुटुंबियांना सदर योजने विषयीची माहिती दिली. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, याविषयीची माहिती देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले व प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे १२ अर्ज भरण्यात आले तसेच गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन समस्येचे निराकरण करून गावाचा विकास करण्याकरिता विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली.
सदर मेळाव्यात उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या तसेच पोलीस विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपतत्राची माहिती दिली. आपला विकास तर गावाचा विकास देशाचा विकास असा मूलमंत्र देऊन जनतेला जीवन प्रवाहात येण्यास सांगितले व मुलांना शिक्षण घेण्या बाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवजीवन विषयी मार्गदर्शन करून नक्षल मध्ये गेलेल्या व्यक्तींना आत्मसमर्पण करून नव्याने जीवनाला सुरुवात करा असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला परिसरातील १२५ ते १५० नागरिक महिला व बाल गोपाल उपस्थित होते. उपस्थितांना अल्पोपहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मेळावा शांततेत पार पाडण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here