उभ्या ऑटोरिक्षाला कार ची धडक : व्याहाड -गडचिरोली मार्गावरील घटना

99

– अपघातात ऑटोरिक्षा चालक जखमी झाल्याची माहिती
The गडविश्व
गडचिरोली : उभ्या असलेल्या ऑटोरिक्षाला भरधाव कार ने पाठीमागून धडक देऊन अपघात झाल्याची घटना आज १० मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास व्याहाड-गडचिरोली मार्गावरील पुलखल फाटा नजीक घडली. या अपघातात ऑटोरिक्षाचालक जखमी असल्याची माहिती आहे.
ऑटोरिक्षाचालक हा कनेरी येथे रुग्णाला सोडून गडचिरोली मार्गाने येत होता दरम्यान पुलखल फाटा नजीक रस्त्याच्या कडेला ऑटो थांबवून ऑटो च्या खाली उतरून फोन वर बोलत असतांना व्याहाड मार्ग गडचिरोली कडे येणाऱ्या भरधाव कार ने उभ्या ऑटोरिक्षाला धडक दिली यात ऑटोरिक्षाचालक जखमी झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. या अपघातात ऑटोरिक्षा चालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बातमी लिहेस्तव अपघातातील जखमीचे नाव कळू शकले नाही. जखमीला उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here