माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते खांदला येथे दरगाहचे उदघाटन

62

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील खांदला येथे मासूम धन्वंतरी दरगाहचे नवीन बांधकाम करण्यात आले. दरगाहचे पूजारी गोविंद कोडापे यांनी दरगाहच्या नवीन बांधकामाच्या उदघाटनाकरिता माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निमंत्रित केले होते. विनंतीला मान देवून माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी खांदला येथे जावून दरगाहचे उदघाटन केले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर, माजी उपसरपंच संजय पोरतेट, अँड.एच.के.आकदर, माधव कूळमेथे, सुरेश सोयाम, दिपक अर्का, सुरेश पेंदाम, नारायण चालुरकर, प्रणय गोडसेलवार, राकेश सड़मेक, गोडसेलवार आदि व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here