सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री : घरगुती एलपीजी सिलिंडरचे भाव वधारले

481
जाहिरात

The गडविश्व
मुंबई : देशातील सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. आता घरगुती सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहे. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यासोबतच आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे.
मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत २२५३ रुपये करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करण्यासाठी पुरेशा आहेत. १ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर ५ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमतही ६५५ रुपयांवर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here