बालविवाह रोखण्यास जिल्हा बाल संरक्षण समिती व पोलिसांना यश

451

– लग्नाची घटीका जवळ असतानाच विवाह रोखला
The गडविश्व
भंडारा : अल्पवयीन मुलीचा सभागृहात विवाह होणार होता, वाजतगाजत नवरदेव लग्नमंडपातही पोहचला होता व लग्नाची घटिकाही जवळच होती मात्र अशातच अचानक जिल्हा बाल संरक्षण समितीचे पथक व पोलीस लग्नमंडपात पोहचले व होणार विवाह रोखला. सदर घटना भंडारा येथे घडली.
भंडारा येथील एका मंगल कार्यालयात बुधवारी विवाह होता. मात्र सदर विवाह होणारी नवरीमुलगी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन पथके तयार करून एक पथक मंगल कार्यालयातील हालचालींवर लक्ष ठेऊन होते. तर दुसरे पथक मुलीने शिक्षण घेतलेल्या शाळेत जन्मतारखेची खातरजमा करत होते तर तिसरे पथक पोलीस ठाणे भंडारा येथे जाऊन पोलिसांचे पथक घेऊन आले. दरम्यान जन्मतारखेचा सकाळच्या सुमारास वाजतगाजत नवरदेव मंडपात पोहचला, लग्न लागण्याची तयारी सुरू झाली होती परंतु जन्मतारखेचा दाखल मिळण्यास उशीर होत असल्याने कारवाई करता येत नव्हती. शेवटी पथकातील अधिकाऱ्यांनी नवरीचे आई वडील व नातेवाईक यांची भेट घेत संपूर्ण प्रकार सांगितला परंतु त्यांनी मुलीची जन्मतारिख १५ एप्रिल २००४ असल्याचस सांगत मुलगी १८ वर्षाची आहे असे ठणकावून सांगितले. शाळेतून जन्मदाखला मुळण्यास उशीर होत असल्याने पथकाने नगर परिषद गाठून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त केला व त्यावर १५ एप्रिल २००५ असे होते. नवरी मुलगी १७ वर्ष १९ दिवसांची असल्याचे आढळून आले. व होणार विवाह रोखण्यात आला. यावेळी नवरदेवाला रुसून परतावे लागले मात्र वऱ्हाडी मंडळींनी जेवणावर ताव मारला. तर नवरीच्या पालकांनी मुलगी सज्ञान झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे लिहून दिले. व नवरदेव नवरीला बाल कल्याण समितीपुढे हजार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here