गडचिरोली जिल्हा दक्षता समिती व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद समितीची सभा संपन्न

36

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा दक्षता समिती व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद समितीची सभा 27 एप्रिल 2022 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी एन.एम.भागडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, व्हि.के.सहारे, खरेदी अधिकारी, कोकड्डे, जिल्हा दक्षता समितीतील अशासकीय सदस्य चंद्रशेखर भडांगे, प्रविण घाटे, मनिष समर्थ, संजय मेश्राम, सौ रंजना गेडाम,रमाकांत ठेंगरे, तसेच सर्व शासकीय सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध समस्या व तक्रारीबद्दल चर्चा करण्यात आली. ज्या विभागाशी तक्रारी संबंधीत होत्या त्याविभागाशी चर्चा करुन त्या समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना केले व कशा सोडविणार आहेत. याबाबत सदस्यांशी चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here